2021 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतातून UAE त शिफ्ट होणार, PAK क्रिकेट मंडळाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. काही राज्यांमध्ये तर कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळत आहे . परिणामी, खान यांनी भारतात पुढील वर्षी वर्ल्ड कप आयोजन करण्याची परिस्थिती दिसत नसल्याचा दावा केला. भारतात पुढील वर्षी होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप UAE त शिफ्ट होईल, असा दावा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( PCB) CEO वासीम खान यांनी केला आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतात २०२१चा वर्ल्ड कप होणार नसल्याचेही खान यावेळी म्हणाले. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात यंदा होणारा वर्ल्ड कप रद्द करावा लागला आणि २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाला पुन्हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.

पुढे बोलताना खान म्हणाले, की पुढील वर्षी भारतात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण, तेथील कोरोना परिस्थितीमुळे पुढील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप UAEला शिफ्ट होऊ शकतो.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( IPL २०२०) BCCIनं UAEत खेळवली. २०२१ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळावा, यासाठी खान यांनी ICC व BCCI कडे विनंती केली होती.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया दोन महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ वन डे व ४ ट्वेंटी-20 सामने होतील. मार्च ते मे या कालावधीत आयपीएल २०२१ चे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.

भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक ट्वेंटी-२० ( जून), आयसीसी वर्ल्ड कप ( ऑक्टोबर) आणि आयपीएल २०२१ हे आहेत.

You might also like