T20 World Cup 2021 | ‘टी’ 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित, जाणुन घ्या 15 सदस्यांची नावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  T20 World Cup 2021 | यूएई आणि ओमाममध्ये (UAE and Omaha) येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरमध्ये होणा-या टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) भारतीय संघ (Indian Union) निश्चित करण्यात आला आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख आहे. यासाठी निवड समितीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी संघ निवडीसंदर्भात चर्चा केलीय. यानंतर अखेर 15 खेळा़डुंची टीम फिक्स करण्यात आलीय.

‘इनसाईड स्पोर्ट्स’नं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी होणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 4 थी टेस्ट सध्या ओव्हलवर (India vs England 4th Test) सुरू आहे. या टेस्टनंतर टीम इंडियाची घोषणा होणार असल्याची माहिती बीसीसीआय च्या सूत्रांकडुन सांगण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय संघाची निवड ही ओव्हल टेस्टच्या निकालावर अवलंबुन झालयं. असे समजते.
टीम इंडियातील सर्व सदस्यांची नावं निश्चित झाली आहेत. विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याशी या विषयावर निवड समितीनं चर्चा केली आहे.
त्यामध्येही याबाबत निर्णय झाला आहे. टीम इंडियातील अनेक जागा निश्चित आहेत.
फक्त काही रिक्त जागांसाठी या बैठकीत चर्चा झालीय, असं सांगण्यात येत आहे.

 

T20 वर्ल्ड कपसाठी ही टीम असण्याची शक्यता –

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन राखीव आणि कव्हर : वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती,
दीपक चहर, पृथ्वी शॉ आणि प्रसिद्ध कृष्णा इत्यादी.

 

Web Title : T20 World Cup 2021 | t20 world cup 2021 selectors confirm team india to be announced soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Relationship | पत्नीने पतीला दिली ‘छोटा पाहुणा’ येणार असल्याची खुशखबर, 2 वर्षापूर्वी नसबंदी केलेल्या पतीची उडाली झोप!

Aadhaar card बनवणं झालं अगदी सोप, परंतु बदल केला तर बदलतील नाही ’नाते’; आता पती, वडिलांचा उल्लेख नाही, त्याठिकाणी ’केयर ऑफ’

EPFO | पीएफ खातेधारक होणार ‘मालामाल’, अकाऊंटमध्ये लवकरच येईल मोठी रक्कम, जाणून घ्या सविस्तर