T20 World Cup 2021 | PAK विरुद्धच्या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीनं दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

दुबई : वृत्तसंस्था – T20 World Cup 2021 | भारत विरुद्ध पाकिस्तान काल (रविवारी) टी-20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup 2021) सामना पार पडला. यामध्ये पाकिस्तानने आपली विजयी कमान रोवली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने 10 विकेट्सने विजय संपादन केला आहे. मात्र, भारताला हार मानावी लागली. या पार्श्वभुमीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं होतं. (T20 World Cup 2021) पाकिस्तानने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. दोघांनी मिळुन विजयी मिळवला.

 

सामना संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, आम्ही आमच्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही. त्यांनी (पाकिस्तानचे खेळाडू) आमच्यापेक्षा प्रत्येक प्रकारात चांगला खेळ केला. एका पराभवानं धोक्याची घंटी वाजवणारी आमची टीम नाही. ही स्पर्धेची सुरुवात आहे, शेवट नाही.’ टीम इंडियानं पहिल्या 13 बॉलमध्ये दोन्ही ओपनर गमावले. त्यानंतर पुनरागमन करणे सोपे नव्हते. असं विराट कोहली याने म्हटलं आहे.

पुढे कोहली म्हणाला, ‘सुरुवातीला 3 विकेट्स गमावल्यानंतर मॅचमध्ये पुनरागमन करणे अवघड होते.
मैदानात पडणाऱ्या दवबिंदूची भूमिका देखील नेहमीच महत्त्वाची असते. त्यामुळे परिस्थिती बदलते.
अशा परिस्थितीमध्ये 10-20 अतिरिक्त रनची आवश्यकता पडते, पण पाकिस्ताननं खूप चांगली बॉलिंग केली,
असं विराट कोहलीने सांगितलं आहे.

 

Web Title :- T20 World Cup 2021 | t20 world cup ind vs pak virat kohli first reaction after the loss against pakistan says its start of tournament not the end of T20 World Cup 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Locker Rules | बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, जर तुम्ही सुद्धा घेतला असेल ‘लॉकर’ तर जाणून घ्या नवीन नियम

Pune Corporation GB | तुकाई दर्शन येथील पाण्याच्या टाकीचे पाणी ‘महंमद वाडी’ला वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – माजी महापौर वैशाली बनकर (व्हिडीओ)

Pune News | कुत्र्यांच्या नसबंदीच्या ‘ऑपरेशन’ थिएटरमध्ये उंदरांचा सुळसुळाट; बंदोबस्तासाठी ‘मांजरी’ पाळायच्या? (व्हिडीओ)

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

Aryan Khan arrest case | ‘समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे…’, वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपानंतर भाजपची सावध भूमिका

Pune News | कुत्र्यांच्या नसबंदीच्या ‘ऑपरेशन’ थिएटरमध्ये उंदरांचा सुळसुळाट; बंदोबस्तासाठी ‘मांजरी’ पाळायच्या? (व्हिडीओ)