T20 World Cup 2022 | टी20 मध्ये बाबर-रिझवानच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

पोलीसनामा ऑनलाईन : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) मधील 41 वा सामना आज पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात खेळवण्यात आला होता. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा होता. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) यांनी एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे.

टी20 विश्वचषक 2022 मध्ये या दोघांनी पहिल्या विकेटसाठी प्रथमच अर्धशतकीय भागीदारी केली, मात्र ती सुद्धा कासवाच्या गतीने. या दोघांनी पाकिस्तानसाठी 63 चेंडूत 67 धावांची भर घातली. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोणत्याही पूर्ण सदस्य देशाने पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी होती.या सामन्यात बाबर आझमच्या रूपाने पाकिस्तानला पहिला धक्का बसला. बाबर 33 चेंडूत 25 धावा काढून बाद झाला. यामध्ये त्याने 2 चौकार मारले.

तर मोहम्मद रिझवान 12 व्या षटकात बाद झाला. रिझवानने 32 चेंडूत 32 धावा केल्या.
पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघासाठी हा करो वा मरोचा सामना होता.
त्यामुळे दोन्ही टीम विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरले होते.
कारण येथे जो संघ जिंकेल त्याला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार होते.
अखेर पाकिस्तानने या सामन्यात बाजी मारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Web Title :-  T20 World Cup 2022 | babar azam and mohammad rizwan is th slowest scoring rate ban vs pak t20 world cup 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | ‘नोटां’ची मत भाजपची, ऋतुजा लटकेंच्या आरोपाला नारायण राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले- ‘आधी प्रमाणपत्र हातात घ्यावं, मगच…’

Sambhaji Raje Chhatrapati | ‘चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर गाठ माझ्याशी’; संभाजीराजेची आक्रमक भूमिका