T20 World Cup 2022 | टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

0
325
T20 World Cup 2022 | ind vs ban dinesh karthik ruled out with back injury rishabh pant set to play against bangladesh at adelaide icc t20 world cup 2022
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. काल दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या (South Africa) सामन्यात एका मोठ्या खेळाडूला दुखापत झाल्याने तो बांग्लादेश विरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. हा सामना एडलेडमध्ये (Adelaide) होणार आहे. या स्पर्धेची सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला पुढचे सामने जिंकणे आवश्यक असणार आहे.

दिनेश कार्तिकला झाली दुखापत?

टीम इंडियाला बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या मॅचमध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) खेळणार नाही आहे. त्याच्या लोअर बॅकला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता त्याच्याजागी विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळणार हे निश्चित आहे.

ऋषभ पहिल्यांदा मैदानात उतरला

रविवारी सामना सुरु असताना दिनेश कार्तिकने दुखापतीमुळे मैदान सोडले. यानंतर ऋषभ पंत विकेटकिपींगसाठी मैदानात उतरला. त्याने पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपमध्ये विकेटकिपिंग केली.

दिनेश कार्तिककडून निराशा

कालच्या सामन्याला टीमला गरज असताना दिनेश कार्तिक बॅटने कमाल दाखवू शकला नाही.
त्याने 15 चेंडूत 6 धावा केल्या. सूर्यकुमारसोबत मिळून त्याने डाव सावरला. पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या नाहीत.

बीसीसीआयकडून स्टेटमेंट नाही

दिनेश कार्तिकच्या दुखापतीबद्दल अजून बीसीसीआयकडून (BCCI) अजून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही.
त्यामुळे दिनेश कार्तिक पुढील स्पर्धेत खेळणार कि नाही हे फिजियोच्या रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल.

Web Title :- T20 World Cup 2022 | ind vs ban dinesh karthik ruled out with back injury rishabh pant set to play against bangladesh at adelaide icc t20 world cup 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा