T20 World Cup 2022 | ‘हे’ 4 स्टार खेळाडू टी-20 विश्वचषकातून झाले बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. यंदाचा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) काही स्टार खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे स्पर्धेला मुकावे लागणार आहे. यामुळे या खेळाडूंच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंविषयी

 

1) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराहने मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. मात्र त्याला पुन्हा एकदा दुखापत झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

 

2) रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधीच विश्वचषकातून बाहेर झाला आहे. जडेजा मागील मोठ्या कालावधीपासून गुडघ्याच्या समस्येचा सामना करत होता. जडेजा बाहेर झाल्यानंतर त्याच्या जागी अक्षर पटेलला (Akshar Patel) संघात स्थान देण्यात आले आहे. (T20 World Cup 2022)

3) जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow)
इंग्लंडच्या संघाचा विकेटकिपर बॅट्समन जॉनी बेअरस्टो देखील या विश्वचषकात खेळताना दिसणार नाही.
बेअरस्टोची इंग्लंडच्या टी-20 विश्वचषक संघात निवड झाली होती, परंतु संघ जाहीर झाल्यानंतर तो गोल्फ खेळताना जखमी झाला आणि संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या जागी सलामीवीर ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

 

4) शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer)
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज यालादेखील या स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्याचे विमान चुकले म्हणून त्याला स्पर्धेला मुकावे लागले आहे.
या विश्वचषकात त्याच्या जागी शामराह ब्रूक्सला संघात स्थान देण्यात आले आहे.

 

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे.
एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये हि स्पर्धा पार पडणार आहे.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | jasprit bumrah ravindra jadeja jonny bairstow and shimron hetmyer have been ruled out of the upcoming t20 world cup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | RSS च्या राष्ट्रीय नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक, म्हणाल्या – ‘काही गोष्टी वास्तविकतेसाठी आणि देशासाठी…’

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त