T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

पोलीसनामा ऑनलाईन टीम – 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Auatrelia) हा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारत 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आपला पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून त्याने सरावाला सुरुवातदेखील केली आहे. या वर्ल्डकप (T20 World Cup 2022) अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे दुखापतीमुळे टीमच्या बाहेर गेले आहेत.

 

बुमराहच्या जागी मोहम्मद शमी
यामुळे जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला घ्यायचे हा टीम इंडियासोमर मोठा प्रश्न पडला आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) तंदुरुस्त असल्यास त्याला पहिले प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यात मोहम्मद शमी संघात सामील होणार आहे. त्याला कदाचित त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. पण अनुभव पाहता तो आयसीसी स्पर्धेचा भाग होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. शमी 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा एक भाग होता.

 

त्यामुळे आता मोहम्मद शमी 2022 च्या टी20 विश्वचषकात जखमी जसप्रीत बुमराहची जागा घेणार आहे.
मोहम्मद शमी येत्या 3-4दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात पोहोचला.
संघाने सरावदेखील सुरु केला आहे. BCCI कडून लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | mohammad shami will replace the injured jasprit bumrah in the 2022 t20 world cup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार

Mohan Bhagwat | मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा संताप, तुम्ही देशात जातीयवाद वाढवताय, इथला हिंदू नराधमांच्या…