T20 World Cup 2022 | सुपर संडे ठरला गेम चेंजर! पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक

अॅडलेड : वृत्तसंस्था – T20 World Cup 2022 | क्रिकेट (Cricket) हा एक असा गेम आहे त्यामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल ते सांगत येत नाही. वर्ल्ड कपच्या (World Cup) मैदानात आज त्याचा प्रत्यय आला. आज सकाळी पार दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि नेदरलँडमधील (Netherlands) सामन्यात याचा प्रत्यय आला. ज्या दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलमधलं स्थान जवळपास निश्चित मानलं जात होतं त्या संघाला आज नेदरलँडच्या संघाने पार धूळ चारली. या धक्कादायक निकालामुळे टीम इंडियाला सेमी फायनलचे दरवाजे उघड झाले. पण सगळ्यात चांदी झाली ती पाकिस्तानच्या संघाची. बाबर आझमच्या (Babar Azam) संघाने आजच्या सामन्यात बांगलादेशला (Bangladesh) हरवून सेमी फायनलमध्ये धडक मारली. (T20 World Cup 2022)
पाकिस्तानची बांगलादेशवर मात
आजच्या सामन्यात बांगलादेशसाठीही सेमी फायनल गाठण्याची संधी होती. कारण पॉईंट टेबलमध्ये दोन्ही टीमच्या खात्यात 4-4 पॉईंट जमा होते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा करो व मरोचा सामना होता. त्यामुळे जिंकणाऱ्या टीमचं सेमी फायनलचं तिकीट पक्क होतं. मात्र या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर मात करत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. (T20 World Cup 2022)
Pakistan restrict Bangladesh to 127/8 👏
Who is winning this?#T20WorldCup | #PAKvBAN | 📝: https://t.co/eA8evvzzw5 pic.twitter.com/A7ozgdMIyv
— ICC (@ICC) November 6, 2022
पाकिस्तानला नशीबाची साथ
पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते. यानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत पुढील सर्व सामने जिंकले मात्र त्यांना बाकी संघाच्या निकालावर अवलंबुन राहावे लागणार होते. त्यानंतर आज सकाळी नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि पाकिस्तानचे नशीब पालटले. गेल्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्ताननं सेमी फायनल गाठली होती.
भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये
दरम्यान सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन तगडे संघ सेमी फायनलमध्ये दाखल झाले आहेत. 9 आणि 10 नोव्हेंबरला सेमी फायनलचे सामने पार पडणार आहेत. ग्रुप 1 मधील अव्वल संघाशी ग्रुप 2 मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाचा सामना होईल. तर ग्रुप 2 मधील अव्वल संघ ग्रुप 1 मधील अव्वल संघाशी खेळेल. म्हणजेच भारतीय संघानं झिम्बाब्वेला (Zimbabwe) हरवल्यास भारत वि. इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) वि. पाकिस्तान असा सामना होईल. आणि जर भारत झिम्बाब्वे विरुद्ध पराभव झाला तर ह्या सामन्यात बदल पाहायला मिळू शकतो.
Web Title :- Andheri Bypoll Result | rutuja latkes first reaction was emotional with the memory of her husband
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update