T20 World Cup 2022 | दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! भारताची सेमीफायनलमध्ये धडक

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2022) अनेक सामन्यांचे आपल्याला धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यातील एक म्हणजे आजचा सामना विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला (South Africa) नेदरलँडने 13 धावांनी हरवून एक मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं टी20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup 2022) आव्हान तर संपुष्टात आलंच पण पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangadesh) संघांना संधी निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे टीम इंडियाला फायदा झाला असून ती सेमी फायनलसाठी पात्र ठरली आहे.

आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरताना नेदरलँड्सने 4 बाद 158 धावा केल्या. स्टीफन मायबर्ग Stephen Myberg ( 37) , मॅक्स ओ’डाऊड Max O’Dowd (29) यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर टॉम कूपर Tom Cooper ( 35) व कॉलिन एकरमन Colin Ackerman ( 41*) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला पार करून दिला. दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नेदरलँड्सने (Netherlands) कमाल करून दाखवली. क्विंटन डी कॉक Quinton de Kock ( 13) व टेम्बा बवुमा Temba Bavuma (20) सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरले आणि संघ गडगडला. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 8 बाद 145 धावाच करता आल्या.

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म झालं आहे.
दक्षिण आफ्रिका या सामन्याआधी 5 पॉईंटसह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या नंबरवर होती.
तर टीम इंडिया 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर. त्यामुळे टीम इंडिया थेट सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.
या सामन्यामुळे वर्ल्डकपमध्ये मोठी उलटफेर पाहायला मिळाली.
दक्षिण आफ्रिकेच्या धक्कादायक पराभवामुळे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर असलेल्या पाकिस्तान
आणि बांगलादेशसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे या दोन्ही संघामध्ये विजयी होती सेमी फायनलमध्ये पोहोचेल.
त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानसाठी आजचा सामना करो वा मरो असा असणार आहे.

Advt.

Web Title :-  T20 World Cup 2022 | south africa vs netherlands highlights t20 world cup super 12 group 2 netherlands stun south africa india enter semis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | मैत्रिणीचे अपहरण करुन लावली विल्हेवाट, पिंपरी चिंचवडमधील पत्रकाराला अटक

Gulabrao Patil | सुषमा अंधारेंवर टीका करताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, म्हणाले – ‘ठाकरेंच्या पिक्चरमध्ये अंधारे या…’