T20 World Cup 2022 | स्पर्धेत पाऊस पडल्यास किंवा सामना टाय झाल्यास… जाणून घ्या ICC चे नियम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका (Sri Lanka) आणि नामिबिया (Namibia) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत 16 संघ एकमेकांबरोबर भिडणार आहेत. यावेळी सगळे संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे हि स्पर्धा अटीतटीची होणार हे मात्र नक्की. आता या स्पर्धेचे नियम जाणून घेऊयात. (T20 World Cup 2022)

 

आयसीसीने (ICC) स्पर्धेसाठी वेगवेगळे नियम केले आहेत, त्यानुसार सामने खेळवले जातील. यामध्ये प्रत्येक संघाला विजयासाठी 2 गुण मिळतील आणि पराभूत झाल्यास 0 गुण मिळतील. तसेच जर सामना बरोबरीत सुटल्यास किंवा पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघाना 1-1 गुण दिला जाईल. गटातील दोन संघांचे गुण समान असल्यास, त्यांनी स्पर्धेत किती सामने जिंकले, त्यांची निव्वळ धावगती किती होती आणि त्यांचा आमने-सामने रेकॉर्ड काय आहे, या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल.

कोणत्या सामन्यासाठी राखीव दिवस
आयसीसीने केवळ प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. म्हणजेच उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असतो.
या सामन्यांच्या दिवशी पाऊस पडल्यास किंवा अन्य कारणांमुळे सामना न झाल्यास तो सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.
तरीदेखील षटके कमी करावी लागली तरी सामना त्याच दिवशी पूर्ण करण्याचा पहिला प्रयत्न असणार आहे.
तसेच पाच षटकेही टाकण्याची परिस्थिती नसेल तर राखीव दिवस वापरला जाईल.
जर सामना वेळेवर सुरू झाला आणि मध्येच पाऊस आला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही,
तर राखीव दिवशी तो सामना जिकडे थांबवण्यात आला तिकडून सुरु करण्यात येईल.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | t20 world cup 2022 icc new rule for the matches if rain interrupts or match tie or no result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिंदेचा वापर शिवसनेविरूद्ध ’कॉन्ट्रॅक्ट किलर’ प्रमाणे, त्यांच्या अधःपतनाची ही सुरुवात, कुठेतरी ब्रेक लावायला हवा

MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार, सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भाजपला इशारा, म्हणाले-‘हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला…’