T20 World Cup 2022 | कोण आहेत प्रबळ दावेदार, बक्षीसाची रक्कम किती, जाणून घ्या एका क्लिकवर

ऑस्ट्रेलिया: वृत्तसंस्था – आजपासून बहुचर्चित टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. अटीतटीच्या या स्पर्धेत विविध 16 देशांतील संघांमध्ये चढाओढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 13 तारखेला होणार आहे. टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup) ही मेगा टूर्नामेंट एकूण तीन टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. 16 पैकी 8 संघ थेट सुपर 12 टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत, तर उर्वरित 4 संघ पात्रता फेरी जिंकून त्यांचे स्थान निश्चित करणार आहेत. पात्रता फेरीत 4-4 संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आपापल्या गटातील टॉप-2 संघ सुपर 12 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-12 टप्प्यात 6-6 संघांचे दोन गट असतील, ज्यामध्ये त्यांच्या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

पहिली फेरी
अ गट: श्रीलंका, यूएई, नेदरलँड्स, नामिबिया
ब गट: आयर्लंड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज

सुपर-12 संघ
गट 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ विजेता, गट ब उपविजेता
गट 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, गट अ उपविजेता, गट ब विजेता

पॉईंटटेबल कशाप्रकारे असेल
आयसीसीने या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) पॉइंट टेबल प्रणाली जाहीर केली आहे. यामध्ये प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण मिळतील आणि पराभूत झाल्यास शून्य गुण मिळतील. तसेच जर सामना बरोबरीत सुटल्यास किंवा पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघाना 1-1 गुण दिला जाईल. गटातील दोन संघांचे गुण समान असल्यास, त्यांनी स्पर्धेत किती सामने जिंकले, त्यांची निव्वळ धावगती किती होती आणि त्यांचा आमने-सामने रेकॉर्ड काय आहे, या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल.

एकूण सात मैदानांवर खेळण्यात येणार सामने
ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये हि स्पर्धा पार पडणार आहे.

विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार
आयसीसी नुसार, टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला1.6 दशलक्ष डॉलर्स, उपविजेत्या संघाला 8 लाख दशलक्ष डॉलर्स मिळतील. तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या उर्वरित दोन संघांना 4-4 लाख डॉलर्स दिले जातील.
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 5.6 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे,
जी सर्व 16 संघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वितरित करण्यात येईल.

वर्ल्डकपचे सामने कुठे पाहता येतील?
भारतातील टी-20 विश्वचषकाचे सामने स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर प्रसारित करण्यात येणार आहे.
तसेच हॉटस्टार आणि वेबसाइटवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

Web Title :- T20 World Cup 2022 | t20 world cup 2022 starts from today read the full details of competitors price money schedule of all the matches

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा