T20 World Cup 2022 | बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीनं केली चिटिंग? बांग्लादेशच्या ‘या’ खेळाडूने केला गंभीर आरोप

ॲडलेड : वृत्तसंस्था – T20 World Cup 2022 | काल भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात अत्यंत रोमहर्षषक लढत झाली. या सामन्यात भारताने 5 धावांनी विजय मिळवला आहे. सुरुवातीला बांग्लादेशने या सामन्यावर संपूर्ण वर्चस्व निर्माण केले होते मात्र शेवटच्या क्षणी हा सामना भारताच्या बाजूने झुकला आणि भारताचा विजय झाला. हा सामना संपल्यानंतर बांगलादेशच्या यष्टिरक्षकाने कोहलीवर (Virat Kohli) खोट्या क्षेत्ररक्षणाचा गंभीर आरोप केला आहे. (T20 World Cup 2022)

 

काय आहे नेमके प्रकरण?
भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यातील पराभवानंतर बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसनने (Nurul Hasan) माजी कर्णधार विराट कोहलीवर खोट्या क्षेत्ररक्षणाचा आरोप करताना म्हणाला कि, ॲडलेडमधील दबावापूर्ण सामन्यात मैदानातील अंपायर्सने एका चुकीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी लक्ष दिले असते तर भारताला 5 धावांची पेनल्टी मिळाली असती. याच 5 धावांमुळे भारताचा या सामन्यात विजय झाला. या विजयासह भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

 

काय घडले 7 व्या षटकात?
सातव्या षटकात कोहलीने अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) डीपवर फेकल्यासारखे भासवले. मॅरेस इरास्मस (Mares Erasmus) आणि ख्रिस ब्राउन (Chris Brown) या अंपायरने याकडे दुर्लक्ष केले. लिटन दास (Liton Das) आणि नजमुल हुसेन शान्तो (Najmul Hussain Shanto) यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. बांगलादेशचे चाहते नुरुल बरोबर असल्याचे म्हणत आहेत, तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांचे म्हणणे आहे की, बांगलादेश पराभव पचवू शकत नाही त्यामुळे असे आरोप करत आहे. जर या सामन्याचा निकाल बांगलादेशच्या बाजूने निकाल लागला असता तर परिस्थिती वेगळी असती असे नुरुल यावेळी म्हणाला. (T20 World Cup 2022)

 

काय आहे फेक फिल्डींगचा नियम?
आयसीसीच्या (ICC) 41.5 च्या नियमानुसार फेक फिल्डिंग (Fake fielding) जर अशी घटना बॅट्समनसोबत घडली असेल तर ते नियमाचे उल्लंघन आहे.
अशा परिस्थितीत अंपायर चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात आणि 5 धावा दंड म्हणून
आणि त्या 5 धावा विरोधी संघाला देऊ शकतात.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | virat kohli is accused by nurul hasan of fake fielding during ind vs ban match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | व्याजाच्या पैशांची वसुलीसाठी फ्लॅट खाली करण्याची धमकी, पती-पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या