T20 World Cup 2022 | ‘विराटला बाद करण्यासाठी…..!’, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार क्रेग एर्विनचे मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन : भारत (India) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) मधील सामना पार पडणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळवण्यात येणार आहे. भारताच्या टृष्टीने हा सामना करो व मरो असा असणार आहे. या सामन्यापूर्वी झिम्बाब्वे संघाचा कर्णधार क्रेग एर्विनने (Craig Ervine) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक मोठे वक्तव्य केले आहे. (T20 World Cup 2022)
काय म्हणाला क्रेग एर्विन?
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने पत्रकार परिषदेत विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विराट आणि टीम इंडियाबद्दल तो म्हणाला कि, ”आम्हाला जगातील काही सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध गोलंदाजी करण्याची उत्तम संधी आहे.” त्यामुळे आम्ही तेथे चांगली कामगिरी न करण्याचे कारण नाही. तसेच विराट कोहलीची विकेट घेण्याची संधी सारखी-सारखी मिळत नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी आमचे वेगवान गोलंदाज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी उत्सुक असतील याची मला खात्री आहे.”
विराटसाठी आमची कोणतीही खास योजना नाही – क्रेग एर्विन
”विराटसाठी आमची काही खास योजना आहे, असे मला वाटत नाही.
मला वाटते की तो एक खेळाडू म्हणून खूप चांगला आहे.
मला वाटत नाही की, अशा खेळाडूंच्या विरोधात कोणतीही योजना कार्य करते.
कारण ते वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेतात.” असे क्रेग एर्विन विराटबाबत म्हणाला.
Web Title :- T20 World Cup 2022 | zimbabwe captain craig ervine backs his bowlers ahead of india clash in t20 world cup
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…