×
Homeक्रीडाT20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये...

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : T20 World Cup 2024 | नुकताच टी-20 विश्वचषक 2022 पार पडला. यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर मात करून विश्वचषकावर आपले नाव कोरले. यानंतर ICC ने आता टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेमध्ये यजमान देशांपासून ते संघांच्या फॉर्मेट आणि संख्येपर्यंत सगळेच बदलण्यात आले आहे. 2024 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक 2022 पेक्षा खूप वेगळा असणार आहे. या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होतील आणि स्पर्धेचे स्वरूप देखील पूर्वीपेक्षा वेगळे असणार आहे. (T20 World Cup 2024)

टी-20 विश्वचषकाचा सध्याचा फॉरमॅट

2021 आणि 2022 च्या टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीपूर्वी दोन टप्पे होते, ज्यात पात्रता फेरी आणि सुपर-12 टप्पा समाविष्ट होते. मात्र या फॉरमॅटमध्ये आता बदल करण्यात आला आहे. टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील बाद फेरीचे सामने सुरू होण्यापूर्वी दोन टप्पे खेळवण्यात येणार आहेत.

टी-20 विश्वचषकाचा नवीन फॉरमॅट

या स्पर्धेत 2024 रोजी एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक गटात पाच संघ असणार आहेत. जे आपापसात खेळतील.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर – 8 फेरीत प्रवेश करतील. यानंतर ते 8 संघ 4-4 च्या दोन गटांमध्ये विभागले जातील.
येथे दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर या 4 संघातील विजेते अंतिम सामना खेळतील.
या स्पर्धेसाठी सर्व 20 संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत.

टी-20 विश्वचषक 2024 साठी 12 संघ निश्चित

टी-20 विश्वचषक 2024 साठी 12 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड,
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेदरलँड, बांगलादेश, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे
संघ निश्चित झाले आहेत. बाकी 8 संघ दोन वर्षांनी सुरु होणाऱ्या पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत.

Web Title :- T20 World Cup 2024 | t20 world cup 2024 next mens t20 world cup to be in played in new format 20 team participate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Bhumkar Chowk | भूमकर चौक ते नवले ब्रिज दरम्यान असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले

Must Read
Related News