मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियातल्या (Austrelia) टी20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) थरार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. आज आणि उद्या सेमी फायनलचे सामने रंगणार आहेत. यामध्ये आज पहिला सामना पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात पार पडणार आहे तर दुसरा सामना उद्या इंडिया (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पार पडणार आहे. या चार संघापैकी जे दोन संघ विजयी होईल ते संघ अंतिम सामना खेळतील. यादरम्यान अनेक दिग्ग्ज आपले भाकीत वर्तवत आहेत. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) भाकीत वर्तवले आहे.
काय वर्तवले भाकीत?
डिव्हिलियर्सच्या मते भारत आणि न्यूझीलंड या दोन टीम फायनलमध्ये धडक मारतील. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड पाकिस्तानवर मात करेल तर दुसऱ्या सामन्यात भारत इंग्लंडवर मात करून अंतिम सामन्यात धडक मारेल.
कधी आणि कुठे होणार सामना?
बुधवार, 9 नोव्हेंबर , न्यूझीलंड वि. पाकिस्तान, पहिली सेमी फायनल, सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दु. 1.30 वा.
गुरुवार, 10 नोव्हेंबर, भारत वि. इंग्लंड, दुसरी सेमी फायनल, अॅडलेड ओव्हल, दु. 1.30 वा
Web Title :- T20 World Cup | ab de villiers predict india and new zealand will face in final of t20 world cup
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update