T20 World Cup | पाकिस्तानला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : टी20 वर्ल्ड कप क्रिकेट (T20 World Cup) स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा (Pakistan) भारत (India) आणि झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) पराभव झाल्याने त्यांचे सेमीफायनल गाठणे अवघड झाले आहे. त्यातच आता पाकिस्तानचा महत्वाचा खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. 3 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान टीमसाठी ‘करा किंवा मरा’चा सामना आहे. या सामन्यात जर दक्षिण आफ्रिकेने (South Africa) त्यांना हरवले तर पाकिस्तानचे वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान (Fakhr Zaman) आता टी20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup) बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र आतापर्यंत फखरच्या दुखापतीबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही.

 

दोन मॅच जिंकण्याचं मोठं आव्हान
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पाकिस्तानच्या टीमला भारत आणि झिम्बावेविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष करावा लागला होता. इतकं करूनही त्यांना दोन्ही मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या टीमचा रनरेटदेखील कमी आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारायची असेल तर पाकिस्तानच्या टीमला दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश या दोन्ही टीम्सना मोठ्या फरकाने हरवावे लागणार आहे. (T20 World Cup)

 

कामगिरी उंचावण्याचं आव्हान
या स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) फारशी काही कामगिरी करू शकला नाही.
त्यामुळे आगामी दोन मॅचेसमध्ये कॅप्टन आणि बॅटर म्हणून दुहेरी कामगिरी पार पाडावी लागणार आहे.
पाकचा स्टार बॉलर शाहिन आफ्रिदीदेखील (Shaheen Afridi) विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.
जर पाकिस्तानला या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर टीममधील इतर प्लेअर्ससनादेखील त्यांची कामगिरी उंचवावी लागणार आहे.

 

Web Title :- T20 World Cup | cricket fakhar zaman out of t20 world cup 2022 before the match against south africa big trouble for pakistan

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cabinet Meeting | रवी राणांसोबतचा वाद मिटताच बच्चू कडूंना शिंदे-फडणवीसांकडून मोठं गिफ्ट

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला