T20 World Cup | टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहच्या नंतर हा प्रमुख गोलंदाज विश्वचषकातुन बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन – T20 World Cup | भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे दोघे दुखापतीमुळे विश्वचषकातुन (T20 World Cup) बाहेर पडले आहेत. त्यापाठोपाठ आता दीपक चहरही (Deepak Chahar) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टी 20 विश्वचषकातील चार राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहरचा समावेश होता.16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे.

दीपक चहर हा गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होता.
त्याने ओडीआय मधून टीम इंडियात पुनरागमन केले होते. मागील महिन्यात झिम्बाम्बवे विरुद्ध सामन्यात दीपक चहरने उत्तम कामगिरी केली होती म्हणूनच विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहरचे नाव निश्चित करण्यात आले होते.
मात्र विश्वचषक सुरू होण्याच्या अवघ्या चार दिवसांआधीच पाठीच्या दुखण्यामुळे चहर संघातून बाहेर पडला आहे.

चहरच्या जागी कोण?
दीपक चहरच्या जागी मोहम्मद शमी (Mohammed Shami) , मोहम्मद सिराज (Mohammad Siraj)
व शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) हे तीन गोलंदाज 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियसाठी रवाना होणार आहेत.

बुमराच्या जागी कोण?
टीम इंडियाच्या निवडसमितीकडून जसप्रीत बुमराच्या जागी मोहम्मद शमीचा विचार करण्यात येत आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड हे मोहम्मद शमीसाठी आग्रही आहेत.

Web Title :- T20 World Cup | icc t20 world cup after jasprit bumrah big shock to team india one more bowler returns after stressed back

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा