यंदा होणारी टी-20 वर्ल्ड कप टळू शकते, लवकरच होणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात करोना व्हारसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना विषाणूचा परिणाम उद्योगधंद्यांवर झालाच आहे. या शिवाय क्रीडा स्पर्धांवर देखील याचा परिणाम झाला आहे. जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणाचू परिणाम यंदाच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर देखील होण्याची शक्यता आहे.यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक पुढे ढकलला जाणार आहे.

कोरोना विषाणूमुळे आयसीसीची ही मोठी स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते, याची अधिकृत घोषणा 26 ते 28 मे दरम्यान होऊ शकते. दरम्यान, 28 मे रोजी आयसीसीची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यावर आणि नवीन अध्यक्ष निवडण्याच्या तारखेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. टी-20 विश्वचषक पुढे ढकलणे म्हणजे आयपीएल 2020 होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यानंतर ही स्पर्धा होऊ शकते.

दरम्यान, कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे जगभरातल्या सगळ्याच क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा धोक्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याच आली आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कोरनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाऊन वाढल्यामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ही स्पर्धा 29 मार्च ते 24 मे या कालावधीत खेळवली जाणार होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like