T20 World Cup | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ‘या’ विकेटकीपरला देणार संधी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – उद्यापासून टी 20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानबरोबर (Pakistan) होणार आहे. त्याअगोदर टीम इंडिया आणखी दोन वॉर्म अप मॅच खेळणार आहे. मात्र तरीदेखील भारताच्या प्लेइंग 11 बद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. यामध्ये टीम इंडिया दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यापैकी कोणाला खेळवणार (T20 World Cup) हे अजून नक्की झाले नाही.

 

पंत-कार्तिकपैकी कोणाला संधी?
टीम इंडियाकडे दोन विकेटकीपर आहेत. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत. या दोघांपैकी कोणाला खेळवणार? हा प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आहे. मागच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Western Australia) विरुद्धच्या सराव सामन्यात ऋषभ पंतने फक्त 9 धावा केल्या. या दोन सामन्यात दिनेश कार्तिकनेही फार चांगली कामगिरी केली नाही. ऋषभ पंतने टीम मॅनेजमेंटचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे. (T20 World Cup)

 

कोणी किती धावा केल्या?
2022 मध्ये दिनेश कार्तिकने 19 इनिंगमध्ये 273 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 150.82 होता.
तर ऋषभ पंतने 17 इनिंगमध्ये 338 धावा केल्या. यावेळी पंतचा स्ट्राइक रेट 136.84 एवढा होता.

 

Web Title :- T20 World Cup | india squad t20 wc team management losing confidence on rishabh pant unlikely to be in indian playing xi for blockbuster clash vs pakistan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Robbie Coltrane Passed Away | ‘हॅरी पॉटर’ मधील हॅग्रिडची भूमिका साकारणारे रॉबी कोलट्रेन यांचे निधन

Police Recruitment | राज्यात पोलीस भरती होणार; 11 हजार 443 पदे भरली जाणार

ST Fare Hike | सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी, दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ