T20 World Cup | सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर संघात करणार ‘हा’ एक बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा (India) सामना इंग्लंडविरुद्ध (England) होणार आहे. गुरूवार 10 नोव्हेंबर रोजी हा सामना पार पडणार आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. (T20 World Cup)

टीम इंडियामध्ये बदल?
झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) सामन्यात भारताने टीममध्ये एक बदल केला होता. या सामन्यात फॉर्ममध्ये नसलेल्या दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh Kartik) ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देण्यात आली होती. टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) एक मॅच वगळता सगळ्या सामन्यांमध्ये खेळला पण त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. तसंच इंग्लंडच्या टीममध्ये डावखुरे बॅटर जास्त असल्यामुळे ते डावखुऱ्या स्पिनरचा सहज सामना करू शकतात त्यामुळे पुढील सामन्यात डच्चू दिला जाऊ शकतो. (T20 World Cup)

अक्षर पटेलच्या जागी कोणाला संधी?
अक्षर पटेलला वगळलं तर रोहितकडे दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ते तीन पर्याय शिल्लक आहेत. यापैकी हुड्डा किंवा हर्षल पटेल यापैकी एका संधी मिळू शकते. सेमी फायनलमध्ये हुड्डाची निवड केली तर रोहितकडे बॉलिंगसाठी 5 पर्यायच शिल्लक राहतात. दुसरीकडे हर्षल पटेलही खालच्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो, तसंच तो फास्ट बॉलरही आहे, त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- T20 World Cup | india vs england semi final rohit sharma could make one change

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | लाच घेताना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पोलीस दलात खळबळ

Andheri Bypoll Result | ‘नोटा’ वरुन ठाकरे गटाची भाजपवर टीका, शिंदे गटाच्या मंत्र्याने दिले प्रत्युत्तर, म्हणाले-‘…तर वेगळे निकाल…’