T20 World Cup | ठरलं ! सेमी फायनलमध्ये ‘या’ टीमशी होणार भारताचा सामना

मेलबर्न : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियात (Austrelia) सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) सुपर 12 फेरीतला अखेरचा सामना आज मेलबर्नमध्ये (Melbourne) पार पडला. टीम इंडियाने आज सुपर 12 राऊंडमधील या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर (Zimbabwe) विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला

या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) अर्धशतकांच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेला 187 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 115 धावांवर बाद झाला. त्यामुळे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. सेमीफायनलमधील चार टीम्स निश्चित झाल्या आहेत. भारत (India), इंग्लंड (England), पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणाबरोबर?
ग्रुप 1 मधील टॉप टीम ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप 2 मधील टॉप टीम ग्रुप 1 मधील
दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे. म्हणजे टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तानचा सामना
न्यूझीलंडबरोबर होणार आहे.

कुठे आणि कधी होणार सामना?
बुधवार, 9 नोव्हेंबर, न्यूझीलंड वि. पाकिस्तान, पहिली सेमी फायनल, सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दु. 1.30 वा.
गुरुवार, 10 नोव्हेंबर, भारत वि. इंग्लंड, दुसरी सेमी फायनल, अ‍ॅडलेड ओव्हल, दु. 1.30 वा

Advt.

Web Title :-  T20 World Cup | india vs zimbabwe ind vs zim t20 world cup 2022 group 2 today match india beat zimbabwe by 71 runs play in semifinal with england

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Andheri Bypoll Result | अंधेरीत भगवा फडकला, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी साधला भाजपसह शिंदे गटावर निशाणा

Jawan | शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपटानंतर आता ‘जवान’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ; ‘या’ दिग्दर्शकाने नोंदवली तक्रार