×
Homeक्रीडाT20 World Cup | आता खेळाडू होणार मालामाल! ICC कडून बक्षिसांची आकडेवारी...

T20 World Cup | आता खेळाडू होणार मालामाल! ICC कडून बक्षिसांची आकडेवारी जाहीर

पोलीसनामा ऑनलाईन – ICC कडून पुरुष T-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) साठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच T-20 विश्वचषक 2022 हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्डकपसाठी प्रत्येक संघाने जय्यत तयारी केली आहे. यावर्षीच्या T-20 विश्वचषक 2022  स्पर्धेत एकूण 16 संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम देण्यात येणार आहे.

कोणत्या संघाला किती रुपये मिळणार?

यंदा T-20 विश्वचषक 2022 चे (T20 World Cup) विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 1.6 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास 13 कोटी 4 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीमध्ये हरणाऱ्या संघाला 8 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 6 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच सेमी फायनलला पोहोचणाऱ्या संघांनाही 4 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी 25 लाख रुपये मिळणार आहे. या स्पर्धेसाठीची एकूण 5.6 मिलियन डॉलर म्हणजेच 46 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

याचबरोबर सुपर-12 मधून बाहेर पडलेल्या आठ संघांना प्रत्येकी 70 हजार डॉलर म्हणजेच 57 लाख रुपये देण्यात येणार आहे.
मागच्या वर्षीप्रमाणेच सुपर-12 मधील प्रत्येक सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला 40 हजार डॉलर्स म्हणजेच 32 लाख 53 हजार रुपये देण्यात येतील.
या स्पर्धेमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघांनी सुपर-12 मध्ये स्थान मिळवले आहे.
मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजेतेपद पटकावले होते.

Web Title :- T20 World Cup | prize money released by icc know how much rupees the winning team will get t20 world cup india virat kohli rohit sharma rahul dravid

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

ACB Trap On Police Inspector In Maharashtra | लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे ‘लाच लुचपत’च्या ‘जाळ्यात’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News