T20 World Cup | रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? दिली ‘हि’ मोठी अपडेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या(Rohit Sharma) टीम इंडियाने (India) टी20 वर्ल्ड कप 2022च्या(T20 world cup 2022) सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताचा सामना इंग्लंडशी (England) होणार आहे. हा सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या अगोदर नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितनं आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली आणि तो खेळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर त्याच्या चाहत्यांना मिळाले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अॅडलेडमध्ये नेट प्रॅक्टिस करताना सोपे ड्रिल करत होता. तो थ्रोडाऊन स्पेशालिस्ट एस रघूचा (S. Raghu) सामना करत होता तेव्हा एक शॉर्ट पिच बॉल वेगाने उसळून त्याच्या उजव्या हाताला लागला. तो सराव सोडून निघून गेला आणि काही वेळ आराम केला. काही वेळानंतर तो पुन्हा मैदानावर आला आणि त्याने सराव सुरू केला. त्यामुळे रोहित शर्मा सेमी फायनल खेळणार हे निश्चित झालं आहे.
भारतीय संघाने सुपर 12 राऊंडमधील ग्रुप 2मध्ये अव्वल स्थानी राहत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली.
टीम इंडियासमोर आता अॅडलेडमध्ये (Adelaide) 10 नोव्हेंबरला इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा फायनल गाठण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 2007 आणि 2014 साली टीम इंडियानं टी20 वर्ल्ज कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचे पारडे इंग्लंडपेक्षा वरचढ आहे. मात्र क्रिकेट (Cricket) हा असा खेळ आहे ज्यामध्ये शेवटपर्यंत काय होईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे इंग्लंड इंडियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश करतो कि भारत पुन्हा इंग्लंडवर वरचढ ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Web Title :- T20 World Cup | rohit sharma injury update what he said in press conference
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sanjay Raut | संजय राऊत यांना केलेली अटक बेकायदेशीर – विशेष सत्र न्यायालयाने ईडीला फटकारले