T20 World Cup | भारत-PAK मध्ये होणार जोरदार टक्कर, UAE आहे तयार, दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये

दुबई : T20 World Cup | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने टी20 वर्ल्ड कप सामन्यांच्या ग्रुपची घोषणा केली आहे. शुक्रवारी ओमानमध्ये ग्रुप ठरवण्यात आले. महत्वाचे म्हणजे भारत आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत एकाच ग्रुपमध्ये आहे. दोघे सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्ये आहेत. दोन्ही टीम शेवटच्या वेळी 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भिडल्या होत्या, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. कोरोना महामारीमुळे टी20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरच्या दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमानमध्ये खेळवला (T20 World Cup) जाईल.

ओमानमध्ये झालेल्या सोहळ्यात आयसीसी अधिकार्‍यांसोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी सुद्धा भाग घेतला. टी20 वर्ल्ड कपचे मॅच शेड्यूल पुढील आठवड्यात जारी केले जाण्याची शक्यता आहे.

टूर्नामेंटच्या पहिल्या फेरीत 8 क्वालिफाईंग टीम भाग घेतील, ज्या ओमान आणि यूएईमध्ये खेळतील. यापैकी चार टीम सुपर 12 फेरीत पोहचतील. पहिल्या फेरीतील 8 टीममध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरर्लंड, स्कॉटलँड, नाम्बीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनीचा समावेश आहे. टूर्नामेंटची फायनल 14 नोव्हेंबरला खेळली जाईल.

आगामी टूर्नामेंट 2016 च्यानंतर पहिला टी20 वर्ल्ड कप असेल. मागच्या वेळी वेस्टइंडीजने इंग्लंडला पराभूत करून कप जिंकला होता. भारताने सुपर-10 च्या ग्रुपच्या तुलनेत पाकिस्तानला 6 विकेटने मात दिली होती. सेमीफायनलमध्ये भारताला विंडीजकडून 7 विकेटने पराभव पत्करावा लागला होता.

सुपर-12

गुप- 1

इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
दक्षिण अफ्रीका
वेस्टइंडीज
राऊंड 1 ग्रुप ए चा विजेता
राऊंड 1 ग्रुप बी चा उपविजेता

ग्रुप -2

भारत
पाकिस्तान
न्यूझीलँड
अफगाणिस्तान
राऊंड 1 ग्रुप बी चा विजेता
राऊंड 1 ग्रुप ए चा उपविजेता

राऊंड-1

ग्रुप-A

श्रीलंका
आयर्लंड
नेदरर्लंड
नाम्बीबिया

ग्रुप-B

बांगलादेश
स्कॉटलँड
पापुआ न्यू गिनी
ओमान

ICC T20 वर्ल्ड कप 2021 चे ठिकाण

– दुबई इंटरनॅशनल स्टेडियम
– शेख जायद स्टेडियम, अबु धाबी
-शारजाह स्टेडियम
– ओमान क्रिकेट अकॅडमी ग्राऊंड

हे देखील वाचा

Pooja Chavan Suicide case | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा अद्याप तपास सुरु, पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  T20 World Cup | t 20 world cup cricket tournament team india and pakistan same group will october november

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update