T20 World Cup | सेमी फायनलपूर्वी इंग्लंडला दुसरा धक्का ! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) सुरू असलेल्या टी- 20 क्रिकेट वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेची दुसरी सेमी फायनल भारत (India) विरूद्ध इंग्लंड (England) यांच्यात गुरुवारी पार पडणार आहे. मात्र या सामन्याअगोदर टीम इंग्लडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर डेव्हिड मलाननंतर (David Malan) आता फास्ट बॉलर मार्क वूडलाही (Mark Wood) दुखापत झाली आहे. मार्क वूड भारताविरुद्धच्या सेमी फायनलच्या सामन्यात खेळणार कि नाही याबाबत अजूनही सस्पेन्स आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्क वूडची दुखापत गंभीर असून, त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. इंग्लंड टीम व्यवस्थापनाने मार्क वूडला दुखापत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (T20 World Cup)

 

मार्क वूडनं नुकतंच दुखापतीतून पुनरागमन केलं होतं. त्याच्या कोपराला दुखापत झाली होती. याच दुखापतीनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याची चर्चा आहे. या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) वूडने 4 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या सेमीफायनल मॅचमध्ये तो खेळू न शकल्यास त्याच्या जागी टायमल मिल्सला (Tymal Mills) संधी दिली जाऊ शकते. मार्क वूड जर भरताविरुद्धचा सामन्यात खेळू शकला नाहीतर भारतासाठी हि दिलासादायक बाब असणार आहे मात्र इंग्लडसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या टीममधील डेव्हिड मलानदेखील जखमी झाला होता. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) झालेल्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली होती.
मलानच्या जागी फिल सॉल्टला टीममध्ये संधी मिळू शकते. इंग्लंडला सलग दोन धक्के बसल्यामुळे टीम इंडियासाठी हि दिलासादायक बाब आहे.
त्यामुळे टीम इंडियाचे पारडे इंग्लंडपेक्षा वरचढ आहे. मात्र हा असा खेळ आहे ज्यामध्ये शेवटपर्यंत काय होईल ते सांगता येणार नाही.
त्यामुळे इंग्लंड इंडियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश करतो कि भारत पुन्हा इंग्लंडवर वरचढ ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup 2022 after dawid malan mark wood also injured before the semi final against england

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Kapoor | इतर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला ‘हा’ सगळ्यात मोठा टप्पा

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)