T20 World Cup | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल कि ऋषभ पंत? फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केले मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – T20 World Cup | रविवारी 30 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात लढत होणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ असतील. टीम इंडियाचे विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलने (K.L.Rahul) आतापर्यंत धावा केल्या नाहीत. पाकिस्तानपाठोपाठ (Pakistan) नेदरलँड्सविरुद्धही राहुल धावा काढण्यात अपयश आले. (T20 World Cup)

 

राहुलच्या खराब कामगिरीनंतर त्याचावर अनेक लोकांकडून टीका करण्यात येत आहे. संघ व्यवस्थापन राहुलऐवजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देऊ शकते का? ऋषभ पंत हा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा भाग आहे, परंतु त्याला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
याबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Batting coach Vikram Rathore)
यांना विचारले असता “संघ असा काही विचार करत नाही.” असे म्हणाले आहेत.

 

तसेच राठोड पुढे म्हणाले कि, ‘पर्थमध्ये आठवडाभर राहण्याचा फायदा आम्हाला मिळेल, त्यामुळेच आधी सरावासाठी पर्थमध्ये येण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आमच्यासाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे हे आम्हाला माहीत होते. त्यामुळेच आम्ही पहिले पर्थला आलो आणि इथे आल्यानंतर सराव केला.
याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
आमच्याकडे ज्या प्रकारचा संघ आहे, ते पाहता आम्हाला वेगवान गोलंदाजीची काही अडचण असेल असे वाटत नाही.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup due to poor form kl rahul also followed the path of virat sought gurumantra from this coach

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही