T20 World Cup | पाकिस्तानच्या PM ने केलेल्या ट्विटवर इरफानचे सडेतोड उत्तर, म्हणाला ” तुमच्यात आणि आमच्यात….”

पोलीसनामा ऑनलाईन टीम : यंदाचे टी-20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकण्याचे भारताचे (India) स्वप्न अपुरेच राहिले. इंग्लंडने (England) सेमी फायनलमध्ये भारताचा दारुण पराभव केल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंडने भारताने दिलेलं 169 धावांचं आव्हान अत्यंत सहजपणे पार केले होते. त्यामुळे आज पाकिस्तान (Pakistan) आणि इंग्लंड यांच्यात या विश्वचषकातला (T20 World Cup) अंतिम सामना पार पडणार आहे. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. यावरून आता पाकिस्तानच्या पंतप्रधानाने भारतीय संघाला टोला लगावला आहे. त्यावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) सडेतोड उत्तर दिले आहे.

 

 

शाहबाज शरीफ काय म्हणाले?

भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shahbaz Sharif) यांनी ट्विट करून अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टीका केली. “या रविवारी 152/0 विरुद्ध 170/0 असा सामना होणार आहे,” असे ट्विट त्यांनी केले. इंग्लंडने ज्याप्रमाणे भारताचा पराभव केला तसाच पराभव यापूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताचा केला होता.

 

 

या ट्विटला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने सडेतोड उत्तर दिले आहे. इरफान पठाणने या ट्विटला उत्तर देत “तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही आमच्या सुखांमुळे आनंदी असतो आणि तुम्ही दुसऱ्यांच्या त्रासामुळे. त्यामुळेच तुमचं स्वत:च्या देशाला अधिक चांगलं करण्यासाठी दूर्लक्ष होत आहे,” असा टोला पाकिस्तानला लगावला आहे.

 

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup final eng vs pak 152 for zero vs 170 for 0
pak pm takes a swipe at team india after loss to england irfan pathan epic reply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा