T20 World Cup | विराट कोहली सलामीला खेळणार? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – T20 World Cup | भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी मोहालीत दाखल झाला आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात होणार आहे. (T20 World Cup)

 

आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीने अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात शतक ठोकत अखेर शतकांचा दुष्काळ संपवला. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहली सलामीला उतरला होता. विराटने यावेळी फक्त 61 चेंडूत 122 धावा करत जबरदस्त खेळी केली. भारतीय फलंदाजाकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

 

रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध असणे नेहमीच चांगले असते. संघात लवचिकता असताना वर्ल्डकप खेळणे महत्त्वाचे असते. कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तुमचे फलंदाज तयार असावेत असे तुम्हाला वाटत असतं. जेव्हा आम्ही नवीन काही प्रयोग करतो, याचा अर्थ समस्या आहे असा होत नाही. (T20 World Cup)

 

रोहित शर्मा म्हणाला, आमच्या खेळाडूंचा दर्जा आणि त्यांच्यातील क्षमतेची आम्हाला जाणीव आहे. पण हो, विराटला सलामीला उतरवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. आम्ही हे नेहमी लक्षात ठेवू. आम्ही सलामीसाठी तिसरा फलंदाज घेतलेला नाही. आयपीएलमध्ये त्याने अनेकदा सलामीला खेळी केली असून, चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे नक्कीच हा पर्याय उपलब्ध आहे.

याचा अर्थ के. एल. राहुलवर चांगली खेळी करण्याचा दबाव असेल. चांगली कामगिरी न केल्यास त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. याबद्दल राहुलला पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता त्याने म्हटले, बाहेर काढावं अशी इच्छा आहे का?

 

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार)
के. एल. राहुल (उपकर्णधार)
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
दीपक हुड्डा
रिषभ पंत
दिनेश कार्तिक
हार्दिक पंड्या
आर. अश्विन
युजवेंद्र चहल
अक्षर पटेल
जसप्रीत बुमराह
भुवनेश्वर कुमार
हर्षल पटेल
अर्शदीप सिंग

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup indian captain rohit shrma virat kohli opening innings

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू

CM Eknath Shinde | ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण…’, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मागितली टाळी

Shivsena | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नवी कार्यकारिणी जाहीर