T20 World Cup | नेदरलँडच्या विजयावर मराठमोळे अभिनेते ऋषिकेश जोशींनी केली हि भन्नाट पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : यंदाच्या वर्ल्डकप (T20 World Cup) अनेक सामन्यांचे आपल्याला धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. यातील एक म्हणजे आजचा सामना विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला (South Africa) नेदरलँडला 13 धावांनी हरवून एक मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं टी20 वर्ल्ड कपमधलं (T20 World Cup) आव्हान तर संपुष्टात आले. यानंतर मराठी लेखक व अभिनेता हृषीकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांनी भन्नाट फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे.

काय म्हणाले ह्रिषीकेश जोशी?

नेदरलँड्स…
दुग्धजन्य पदार्थांसाठी ओळख आहे म्हणून एवढं दूध का दूध पानी का पानी करावं? ‘चीज’ कसं करावं हे जगाला आज दाखवून दिलं राव तुम्ही! असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरताना नेदरलँड्सने 4 बाद 158 धावा केल्या. स्टीफन मायबर्ग Stephen Myberg (37) , मॅक्स ओ’डाऊड Max O’Dowd (29) यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर टॉम कूपर Tom Cooper ( 35) व कॉलिन एकरमन Colin Ackerman (41*) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला पार करून दिला.दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नेदरलँड्सने (Netherlands) कमाल करून दाखवली. क्विंटन डी कॉक Quinton de Kock (13) व टेम्बा बवुमा Temba Bavuma (20) सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरले आणि संघ गडगडला. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात 8 बाद 145 धावाच करता आल्या.

टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म झालं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या धक्कादायक पराभवामुळे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर असलेल्या पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशसाठी (Bangladesh) मोठी संधी आहे. त्यामुळे या दोन्ही संघामध्ये जो विजयी होईल तो संघ सेमी फायनलमध्ये पोहोचेल. त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानसाठी आजचा सामना करो वा मरो असा असणार आहे.

Web Title :-  T20 World Cup | t20 world cup sa vs ned highlights marathi writer hrishikesh joshi post viral match updates wc point table

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Varun Dhawan | वरुण धवन करत आहे ‘या’ गंभीर आजाराचा सामना

Maharashtra Police Recruitment | राज्यात होणार 18 हजार 331 पोलिसांची भरती, आधी होणार ‘ही’ परीक्षा

Andheri East Bypoll Result 2022 | धनुष्यबाण गेला, पण मशाल धगधगली, 15 व्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंची मोठी आघाडी