T20 World Cup | भारताच्या ‘या’ 5 खेळाडूंचा अखेरचा टी-20 वर्ल्डकप, देशाला चॅम्पियन करण्याची ‘हि’ शेवटची संधी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) 16 ऑक्टोबरपासून या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियात प्रथमच टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) होत आहे. हा वर्ल्डकप काही भारतीय खेळाडूंचा अखेरचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे 15 वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवण्याची त्यांच्याकडे अखेरची संधी असणार आहे. चला तर जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल…

 

१) विराट कोहली (Virat Kohli)
पुढील महिन्यात विराट कोहली 34 वर्षाचा होईल. गेल्या काही वर्षात धमाकेदार कामगिरी करूनसुद्धा त्याला अद्याप वर्ल्डपक जिंकता आला नाही. अशावेळी जर भारत यंदाच्या स्पर्धेत चॅम्पियन ठरला तर या वर्ल्ड कपनंतर विराट टी-20 मधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.

 

२) रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारताचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कप 2022 मध्ये शानदार फलंदाजी केली होती. या स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळाल नसले तरी रोहितने वर्ल्डकपच्या आधी फॉर्म मिळवला आहे. रोहित सध्या 35 वर्षाचा आहे आणि हा त्याचा अखेरचा टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) असू शकतो. रोहित 2007 साली धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप विजेत्या संघात होता.

 

३) दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)
सध्याच्या वर्ल्डकप संघात सर्वाधिक वय असलेला खेळाडू कार्तिक आहे. तो 37 वर्षाचा असून 3 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. कार्तिक सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो देशाला दुसऱ्यांदा चॅम्पियन करण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतो. दिनेश कार्तिकदेखील 2007 साली धोनीच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप विजेत्या संघात होता.

४) आर अश्विन (R.Ashwin)
भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विन देखील मोठ्या कालावधीनंतर टी 20 संघात परतला आहे.
आयपीएल 2021 मधील कामगिरीच्या जोरावर त्याने संघात आपले स्थान पक्के केले आहे.
तो सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप खेळत आहे.

 

५) भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)
भुवनेश्वर कुमार हा भारताचा सर्वात अनुभवी जलद गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहच्या (Jaspreet Bumrah) गैरहजेरीत सर्वात मोठी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.
नव्या चेंडूने तो जितका प्रभावी ठरतो तितकाच डेथ ओव्हर्समध्ये महाग ठरत आहे.
त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप हा भुवीचा अखेरचा वर्ल्डकप ठरू शकतो.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup virat kohli to rohit sharma this edition will be last for these indian players

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आजपासून रंगणार महिला आशिया चषकाचा थरार; इंडिया वि. श्रीलंका होणार पहिली लढत

Eng vs Pak | इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात बॉल लागल्यामुळे भर मैदानात कळवळला अम्पायर, Video आला समोर

World Table Tennis Championships | जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, उझबेकिस्तानचा केला पराभव