T20 World Cup मध्ये विराटचा दबदबा, 19 डावात झळकावली 10 अर्धशतके

पोलीसनामा ऑनलाईन टीम – टी 20 विश्वचषकाला (T20 World Cup) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या विश्वचषकासाठी सगळ्याच टीमनी जोरदार तयारी केली आहे. भारत या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला (Australian) पोहोचला असून त्याने सरावसुद्धा सुरु केला आहे. या विश्वचषकात भारताचा (India) पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) होणार आहे. या विश्वचषकात विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. कारण विराट कोहलीचं टी 20 मधील रेकॉर्ड चांगले आहे. विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकतेच त्याने टी 20 क्रिकेटमध्ये (T20 World Cup) शतक झळकावलं आहे. विराट कोहलीनं विश्वचषकातील 19 डावात 10 अर्धशतकं झळकावली आहे. तसेच दोन विश्वचषकात विराट कोहलीने मालिकाविराचा पुरस्कार पटकावला आहे.
विराटच्या नावावर सर्वाधिक अर्धशतके
विराट कोहलीनं आतापर्यंत टी 20 विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीनं टी 20 विश्वचषकाच्या 21 सामन्यातील 19 डावांत 10 अर्धशतकं झळकावली आहे. यामध्ये त्याने 76.81 च्या सरासरीने 845 धावा केल्या आहेत. टी 20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं विराट कोहलीच्या नावार आहे. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 8 अर्धशतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विराट कोहलीची सध्याची कामगिरी पाहाता चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक
16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे.
13 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या सात शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
यामध्ये अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या शहरांचा समावेश आहे.
उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील.
तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.
Web Title :- T20 World Cup | virat kohli has scored 10 fifties from just 19 innings in t20 world cup history
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…, नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप
Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप