Taapsee Pannu | तापसी पन्नूच्या ‘रश्मि रॉकेट’मधील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणं झालं रिलीज (Video)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Taapsee Pannu | बॉलीवूडमधील प्रसिद्ध नायिकांमधील एक तापसी पन्नू (Taapsee Pannu). तापसीच्या ‘रश्मि रॉकेट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रसिक प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, (Rashmi rocket) ‘रश्मि रॉकेट’ या महिन्यातील 15 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

तापसीच्या (Taapsee Pannu) रश्मि रॉकेट या चित्रपटातील ‘जिंदगी तेरे नाम’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. (Zindagi Tere Naam) गाण्यामध्ये तापसी पन्नू सोबत प्रियांशू पेन्युली दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील या गाण्याला चांगली पसंती दर्शवली आहे. तसेच तापसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सुद्धा हे गाणं शेअर केलंय. हे गाणं अमित त्रिवेदी यांनी गायलं असून गाण्याचे बोल कौसर मुनीर यांनी लिहिलं आहे.

 

‘जिंदगी तेरे नाम’ या गाण्याची रचना अप्रतिम आहे. या गाण्याचे बोल पटकन मनाला स्पर्शून जातात.
हे गाणं खास कपल्ससाठी आहे. जे कपल्स खूप अपयशातून गेले आहे. तरीदेखील एकत्र संकटांना सामोरे जातात.
गाण्यात तापसीनं आपल्या अभिनयानं गाण्याची आणखी शोभा वाढवली आहे.

 

दरम्यान, यूट्यूबवर एका दिवसात या गाण्याला 98 हजार पेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे.
तर गाण्यामध्ये चित्रपटामधील रश्मि म्हणजेच तापसीला कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतोय.
ते तिच्यासाठी खूप अवघड जातय. परंतु अशा वाईट परिस्थितीमध्येपण तिला जोडीदाराचं मोलाचं सहाय्य मिळत आहे.

Web Title :- Taapsee Pannu | another new song released from taapsee pannu film rashmi rocket see video of zindagi tere naam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bharti Vidyapeeth Recruitment-2021 | भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’

Modi Government | मोदी सरकार ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना देणार पदोन्नती, 15000 रुपये महिना वाढेल पगार