‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेक मधून ‘या’ अभिनेत्रीला काढून टाकले 

मुंबई : वृत्तसंस्था- ऐंशीच्या दशकातील संजीवकुमार स्टार हिट चित्रपट ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.तर या चित्रपटात अभिनेत्री म्हणून तपासी पन्नू दिसणार होती.पण आता या चित्रपटातून तापसीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
या चित्रपटासाठी तापसीने  तारखाही उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र ऐनवेळी तापसीला कोणतीही पूर्वकल्पना न देता चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आले आहे.तापसीनं या सर्व कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
‘दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता मला या चित्रपटातून वगळलं. पटेल असं एकही कारण त्यांनी मला दिलं नाही. निर्मात्यांकडे विचारलं असता त्यांनीही स्पष्टीकरण द्यायला नकार दिला. मला चित्रपटातून का काढून टाकलं याचं मला उत्तर हवं आहे’ असं म्हणत तापसीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
या चित्रपटात तिच्या जागी अनन्या पांडे हिची वर्णी लागली आहे. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.अनन्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या बॉलिवूडमध्ये कार्तिक आणि अनन्या यांच्या अफेअरच्या चर्चा रंगात आहे.