×
Homeताज्या बातम्याTaapsee Pannu | तापसी पन्नूचा आगामी चित्रपट होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Taapsee Pannu | तापसी पन्नूचा आगामी चित्रपट होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाईन : Taapsee Pannu | अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकते. पण दुसरीकडे तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला ट्रोल देखील केले जाते. आता तापसीची एक पोस्ट जोरात वायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. चित्रपट ‘ब्लर’ ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तापसी ने ही बातमी शेअर करत चित्रपटाचा एक पोस्टर देखील तिने पोस्ट केला आहे. हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे. आता तापसीच्या पोस्टने चाहते चांगलेच उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. (Taapsee Pannu)

विशेष म्हणजे या चित्रपटातून तापसी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिच्या या पोस्टला सोशल मीडियावर लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी तापसी ‘दोबारा’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. मात्र अनुराग आणि तापसीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला गेला. (Taapsee Pannu)

तापसीचा हा नवा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी झी 5’ वर प्रदर्शित होणार आहे.
आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक झालेले आहेत.
एवढेच नाही तर तापसी राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात देखील झळकणार आहे.
त्याचबरोबर ‘वो लडकी है कहा’ या चित्रपटातही तापसी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title :- Taapsee Pannu | bollywood actress taapsee pannu debuet film as producer is set to release on ott Platform

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | …म्हणून नात जावयाने केला 74 वर्षाच्या सासूच्या खूनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

Megha Dhade | Bigg Boss विजेत्या अभिनेत्रीने शिव आणि विणाच्या नात्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्त्यव्य

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News