तापसीच्या घरी IT रेडनंतर बॉयफ्रेंडने मागितली क्रीडा मंत्र्यांकडे मदत, रिजीजू यांनी दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या वेगळ्याच अडचणीत अडकत चालली आहे. जेव्हापासून आयकर विभागाकडून तिच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे आणि मोठी चौकशी सुरू आहे, अभिनेत्री आणि तिचे कुटुंबिय अस्वस्थ आहे. सोशल मीडियावर तापसीला बॉलीवुडच्या अनेक सेलेब्सने समर्थन दर्शवले आहे. मोदी सरकारवर टिका केल्यानेच तिच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. आता तापसीचा बॉयफ्रेंड आणि भारतीय बँडमिनट कोच मेथियस बोई याने क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांना एक ट्विट लिहिले आहे.

मॅथियसने ट्विट करून यावर चिंता व्यक्त केली आहे की, आयटी रेडमुळे तापसी आणि तिचे कुटुंब खुप अस्वस्थ आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, मी थोडा अस्वस्थ आहे. पहिल्यांदा मी कोच म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे, परंतु दुसरीकडे तापसीच्या घरी रेड केली जात आहे, तिच्या कुटुंबाला अडचणीत आणले जात आहे, किरणजी तुम्ही काहीतरी करा.

तापसीच्या बॉयफ्रेंडकडून थेट केंद्रीय मंत्र्याला विनंती करण्यात आली होती, अशावेळी उत्तर सुद्धा खुप चांगलेच मिळाले.

मंत्र्याने दिले हे उत्तर
किरण रिजीजू यांनी बँडमिंटन कोचला देशाचे कायदे समजावत ट्विट केले. त्यांनी लिहिले – कायदा सर्वात मोठा आहे आणि आपण सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे. हा विषय माझ्या आणि तुमच्या क्षेत्राच्या बाहेरचा आहे. आपण आपल्या प्रोफेशनल ड्यूटीकडे लक्ष दिले पाहिजे जे भारतीय खेळासाठी लाभदायक राहिल. मंत्र्याने केलेले ही ट्विट सोशल मीडियावर वायरल होत आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिय दिसून येत आहेत.

काय आहे प्रकरण ?
बॉलीवुड डायरेक्टर अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मनटेना यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा बुधवारी पडला होता. मधु मनटेनाची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयावर सुद्धा प्राप्तीकरचे अधिकारी पोहचले होते. ही छापेमारी फॅटम चित्रपटाच्या टॅक्स चोरीसंबंधी करण्यात आली होती. असेही वृत्त आहे की, तापसीच्या घरातून 5 कोटींची कॅश सापडली आहे, ज्याची चौकशी सुरू आहे. अभिनेत्रीची दुसर्‍यांदा चौकशी केली जाऊ शकते.