‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार क्रिकेटर मिताली राजची भूमिका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. या बायोपिकला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. अशातच आता धाकड गर्ल मिताली राजच्या जीवनावरही सिनेमा येणार आहे. मिताली राजनं ठणकावून सांगितलं की, क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ नाही. आता लवकरच तिचा जीवनपट सिनेमातून समोर येणार आहे. या सिनेमात मितालीची भूमिक अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे.

मितालीच्या बायोपिकचं नाव शाबाश मिठू असणार आहे. राहुल ढोलकिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. फिल्म ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं स्वत: याबाबत सोशलवरून माहिती दिली आहे. तरणनं तापसी आणि राहुल ढोलकियाचा फोटो शेअर केला आहे.

आज मितालीचा वाढदिवस आहे. तापसीनंही मितलीचा फोटो इंस्टावरून शेअर करत तिला शभेच्छा दिल्या आहेत. फोटोत मिताली केक कापताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तापसी म्हणते, “तू आम्हाला खूप काही शिकवलं आहे. माझं हे भाग्य आहे की, तुझी भूमिका मला पडद्यावर साकारायला मिळत आहे. हा माझ्यासाठी एक सन्मान आहे.”

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती थापडमध्ये दिसणार आहे. तापसी एथलिट रश्मीच्या भूमिकेतही दिसणार आहे. सध्या तापसी मितालीची भूमिका कशी साकारते याला घेऊन चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

 

 

You might also like