IT रेडनंतर तापसी पन्नूने पहिल्यांदा व्यक्त केली प्रतिक्रिया, म्हणाली – ‘आता मी स्वस्त राहिले नाही’

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोकांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. तापसी पन्नूच्या घरी आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात तपास यंत्रणेला कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर, तापसी पन्नूची डोकेदुखी वाढली आहे. आयटीच्या या हल्ल्यामुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज आहेत. दरम्यान, छाप्यानंतर पहिल्यांदाच तापसीने तीन ट्विट करून आपल्या निर्भयतेचा पुरावा दिला आहे.

तापसीने या ट्विटमध्ये कंगना रनौतवर अप्रत्यक्ष टीका केली. तिने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप पॅरिसमध्ये बंगला खरेदी करण्यासंदर्भात करण्यात आला, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या येत आहे.” दुसर्‍या ट्वीटमध्ये तापसीने लिहिले की, “भविष्य बनविण्यासाठी माझ्यावर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे, कारण मी यापूर्वी पैसे घेण्यास नकार दिला होता.” तसेच, तिसर्‍या ट्विटमध्ये तापसींने लिहिले की, “आपल्या सन्माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 च्या रेडच्या आठवणी माझ्यासमोर ताज्या झाल्या आहेत.” त्याव्यतिरिक्त, तिने लिहिले की, “आता ती स्वस्त राहली नाही. वास्तविक, सुरुवातीच्या वादाच्या दरम्यान कंगना रनौतने तापसीला स्वस्त कॉपी म्हटले होते.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकत्याच झालेल्या आयटी छापे प्रकरणावर निवेदन दिले होते. सीतारमण म्हणाल्या, “मी कुठल्याही खटल्याचा उल्लेख करणार नाही किंवा कोणाचेही नाव घेणार नाही, पण जेव्हा आमच्या सरकारच्या काळात अशी कारवाई होते तेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागतात, तर जेव्हा 2013 मध्ये या लोकांवर कारवाई केली गेली होती, तेव्हा कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही.