अभिनेत्री तापसीनं एका ‘शॉट’साठी खाल्ल्या 7 ‘थप्पड’, केला स्वतः ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून आपला आगामी सिनेमा थप्पडमुळे चर्चेत आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरनंतर या सिनेमाची खूप चर्चा होताना दिसत आहे. सिनेमात एक सीन आहे की, तापसीचा ऑनस्क्रिन पती पवेल गुलाटी तिला एक चापट मारतो. परंतु या एका चापटीसाठी तिला 7 खऱ्याखऱ्या चापटी खाव्या लागल्या आहेत. खुद्द तापसीनंच याबाबत सांगितलं आहे.

तापसीनं सांगितलं की, पवेल गुलाटी एवढा घाबरला होता की, तिला चापट मारण्यासाठी हिंमत एकवटण्यासाठीच त्याला दोन दिवस लागले. तापसी म्हणते, “परफेक्ट शॉटसाठी मला वारंवार चापट खावी लागत होती. माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी एवढे रिटेक कधीच नाही दिले. फिल्मचे चीफ म्हणाले की, चापट एकदम योग्य जागेवर लागायला हवी. कारण जेव्हा लोक स्क्रीनवर पाहतील तेव्हा ते एकजम इॅम्पॅक्टफुल वाटायला हवं.”

तापसी म्हणते, “चापट मारण्यााचा सीन शुट करताना पवेल कधी गळ्यावर मारायचा तर कधी कानावर चापट मारायचा. तेव्हा मी त्याला म्हणाले काहीही विचार करू नकोस, फक्त मला एक जोरात चापट मार.”