अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘कबीर सिंह’वर ‘निशाना’ !

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू ही अनेकदा महत्वाच्या मुद्द्यांवर सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया देत असते. सोमवारी तापसीने हत्येच्या घटनेवर असे ट्विट केले की, चाहते तिच्यावर नाराज झाले. अनेक फिमेल चाहत्यांनी तिला नीट बोलण्याचा सल्ला दिला.

तापसी पन्नूने १५ जुलैला एका वृत्तसंस्थेच्या बातमीवर रिट्विट करुन लिहले की, ‘ते एकमेकांवर कदाचित प्रेम करत होते. असे करुन त्याला त्यांचे प्रेम सिद्ध करायचे होते जेणेकरुन लोकांना याच्या प्रेमाचा विश्वास बसेल.’ तापसीने ज्या घटनेवर रिट्विट केले ती घटना नागपूरमध्ये एक बॉयफ्रेंडने आपल्या १९ वर्षाच्या गर्लफ्रेंडची हत्या केली. मुलाने त्या मुलीला यासाठी मारले कारण त्याला तिच्या प्रेमावर संशय होता.

तापसीचे हे ट्विट असे स्पष्ट सांगते की, तिने ‘कबीर सिंह’ चित्रपटाचे डायरेक्टर संदीप वांगावर इशारा केला आहे. कारण काही दिवसांपुर्वी त्यांनी ‘कबीर सिंह’ला डिफेंड करत म्हणाले की, ते प्रेमच काय ज्यावर हात उचलायचा अधिकार नाही. संदीप वांगाच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांनी या वक्तव्याला टिका केली. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली पण संदीप वांगानंतर तापसीच्या या गंभीर मर्डरच्या घटनेवर ट्विट करणे यूजर्सला आवडले नाही. सोशल मिडियावर तापसीला खूप ट्रोल करण्यात आले. यानंतर यावर उत्तर देत तापसीने सांगितले की, ज्या लोकांना माझे ट्विट कळाले नाही त्यांनी माझ्या ट्विट इग्नोर करा, धन्यवाद..

तापसीच्या दुसऱ्या ट्विटनंतर तिचे सपोर्टर ही भडकले. सोशल मिडियावर लोकांनी तिला चांगलेच झाडले. एक महिला युजरने लिहले की, तुमच्यासारख्या कलाकारांनी अशा हत्यांवर कमेंट करणे योग्य नाही. एका युजरने लिहले की, १९ वर्षाच्या मुलीची हत्या कोणत्याप्रकारचे व्यंग होऊ शकत नाही. अनेक युजर्सने तिला ट्रोल केले.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी