‘गेम चेंजर’ क्रिकेटपटूच्या भूमिकेत तापसी, ‘शाबास मिथू’चं पोस्टर आलं समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा काळच सुरू आहे जणू. कारण एका मागोमाग एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. अनेक बायोपिक रांगेत आहेत. यात पृथ्वीराज, मैदान, 83, सायना, सरदार उधम सिंग, मिसाईल मॅन अशा अनेक बायोपिकचा समावेश आहे. याशिवाय भारतीय महिला क्रिकेटर संघाची कॅप्टन मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाही येणार आहे.

या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नून मिताली राजची भूमिका साकारणार आहे. शाबाश मिठू असं या सिनेमाचं नाव आहे. तापसीनं या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर सोशलवरून शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये तापनी पन्नू मितालीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तिच्या हातात बॅट दिसत आहे. तिची पोज पाहून तिनं नुकताच जोरदार शॉट मारत चेंडू टोलवला आहे असं वाटत आहे.

शाबाश मिठू सिनेमाचं पोस्टर शेअर करत तापसी म्हणते, “मला नेहमीच विचारले जाते की, तुझा आवडता पुरुष क्रिकेटर कोण आहे. परंतु असा प्रश्न विचारणाऱ्यांनी माझी आवडती महिला क्रिकेटर कोण आहे असा प्रश्न विचारावा अशी माझी अपेक्षा आहे. मिताली राज माझी आवडती क्रिकेटपटू आहे. ती एक अल्टीमेट गेमचेंजर आहे.”

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं सूरमा सिनेमातही एका खेळाडूची भूमिका साकारली होती. या सिनेमात ती हॉकी प्लेअरच्या रोलमध्ये दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा