क्रिकेटच्या ऋतुत तापसीनं हातात घेतली बॅट ! शाहरुखच्या सिनेमापूर्वीच पूर्ण करणार ‘या’ कॅप्टनची कहाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्पोर्ट ड्रामा सिनेमांवर काम सरू आहे. यातील अनके बायोपिक आहेत. मैदान, 83, सायना, सरदार उधम सिंग, मिसाईल मॅन अशा अनेक बायोपिकचा समावेश आहे. याशिवाय भारतीय महिला क्रिकेटर संघाची कॅप्टन मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाही येणार आहे. शाबाश मिठ्ठू असं या सिनेमाचं नाव आहे. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. अलीकडेच तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. ती लूप लपेटा या सिनेमातही दिसणार आहे. परंतु याची शुटींग अद्याप बाकी आहे. आधी ती शाबाश मिठ्ठूवर काम करणार आहे.

तापसीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती हातात बॅट घेऊन पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या तिचा फोटो खूप चर्चेत असल्याचं दिसत आहे.

तापसीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा फोटो शेअरही केला आहे.

तापसीनं या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर सोशलवरून शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये तापनी पन्नू मितालीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तिच्या हातात बॅट दिसत आहे. तिची पोज पाहून तिनं नुकताच जोरदार शॉट मारत चेंडू टोलवला आहे असं वाटत आहे.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठ्ठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. इतकंच नाही तर तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती सोबतही ती एका तमिळ सिनमात काम करणार आहे.