ताज्या बातम्यामनोरंजन

Taapsee Pannu | तापसी पन्नूनं चाहत्यांना दिली गुडन्यूज म्हणाली, ‘येत्या जुलैमध्ये…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात मोठा आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कित्येक हजारो – लाखो प्रेक्षक तिच्या एका झलक साठी वेडे झालेले पाहायला मिळतात. सध्या ती आगामी चित्रपट ‘शाबाश मिथू’ मध्ये झळकणार आहे.

 

तापसीचा ‘शाबाश मिथू (Shabaash Mithu)’ हा चित्रपट 15 जुलैला प्रदर्शित होणार आहे. तिचा हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिच्या जीवनावर आधारित आहे. श्रीजीत मुखर्जीनं हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, प्रिया एवेननं हा चित्रपट लिहिला आहे. तापसीने इंस्टाग्रामवर (Taapsee Pannu Instagram Post) पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख शेअर केली आहे.

खेळाडू मितालीनं वन- डे क्रिकेट मॅचमध्ये सलग 7 वेळा 50 धावा केल्या. तसेच तिनं भारताला चार विश्र्वचषक जिंकून दिलं. तापसीच्या या चित्रपटामध्ये (Taapsee Pannu Upcoming Movie) मितालीचा आठ वर्षापासून ते क्रिकेट लीजेंड बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नेटकरी हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

दरम्यान, तापसीनं शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये (Taapsee Pannu Instagram Caption) लिहिलं की, “स्वप्न आणि ते साकार करण्याची योजना असलेल्या मुलीपेक्षा येथे काहीही शक्तिशाली नाही ! ही कथा आहे अशाच एका मुलीची जिने या “जंटलमन्स गेम” मध्ये बॅटने आपल्या स्वप्नाचा पाठलाग केला. ‘शाबाश मिथू’ 15 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ”

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- taapsee pannu good news taapsee pannu made a big announcement suddenly gave news to the fans

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

 

 

Back to top button