‘थप्पड’ चा दुसरा ट्रेलर रिलीज ! तापसी पन्नू प्रेक्षकांना म्हणाली… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तापसी पन्नू आगामी सिनेमा थप्पडमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. यानंतर या सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली होती. याच सिनेमाचा आता दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सध्या या ट्रेलरमुळे तापसीनं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पहिल्या ट्रेलमधीलच काही सीन यात दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, तापसी आपल्या पतीसोबत खूप खुश आहे. परंतु अचानक असं काही होतं की, पती तिला एक चापट मारतो. या सिनेमात पावेल गुलाटीनं तापसीच्या पतीची भूमिका साकारली आहे. पावेलनं तापसीला थप्पड मारल्यानंतर तापसी प्रेक्षकांसोबत संवाद साधते. तापसी म्हणते, “थप्पड म्हणजे एवढीशी गोष्ट नाही. मी थप्पडच्या पुढे जाऊ शकत नाही. अशा प्रकारची वर्तणूक कॉमन आहे असं अजिबात नाही. हा व्हिडीओ जास्तीत जास्त रिपोर्ट करा. ज्याप्रमाणे प्रेमात थप्पडची गरज नाही तसंच इंटरनेटवर अशा व्हिडीओची जागा नाही. या व्हिडीओला मोस्ट रिपोर्टेड व्हिडीओ बनवा.” असंही तिनं म्हटलं आहे.

https://youtu.be/bkxmMeDIJlE

डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी डायरेक्ट केलेला हा 11 वा सिनेमा आहे. अनुभव आणि तापसी यांनी 2018 मध्ये आलेल्या मुल्क सिनेमात एकत्र काम केलं होतं. यानंतर त्यांचा हा सोबत काम करण्याचा दुसरा सिनेमा आहे. थप्पड सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.