‘हिरोच्या पत्नीनं काढलं होतं सिनेमातून बाहेर’; तापसी पन्नूचा मोठा ‘गौप्यस्फोट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) काही दिवसांपूर्वीच चर्चेचा हिस्सा बनताना दिसली होती. याचं कारण तिचा एखादा सिनेमा किंवा तिनं केलेलं वक्तव्य नाही तर तिची हेअर स्टाईल होती. आपल्या हेअर स्टाईलनं तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कधी असंही झालं आहे की, काही किरकोळ कारणावरून तिला सिनेमातून काढण्यात आलं आहे. खुद्द तापसीनंच याबाबत खुलासा केला आहे.

तापसीनं सांगितल्यानुसार, इंडस्ट्रीत अशा अनेक वेळा आल्या जेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं. हिरोच्या पत्नीमुळं तिला सिनेमातून रिप्लेस केलं गेलं.

एका मुलाखतीत बोलताना तापसी म्हणाली, मला एका सिनेमातून फक्त या कारणामुळं बाहेर काढण्यात आलं होतं, कारण हिरोच्या पत्नीची इच्छा नव्हती की, मी त्या सिनेमाचा हिस्सा बनावं. यावेळी बोलताना तिनं तिच्या संघर्षाबद्दलही सांगितलं आहे.

तापसीनं सांगितलं की, अनेकांनी तिच्या लुक्सवरूनही तिच्यावर टीका केली होती. ती जास्त सुंदर दिसत नव्हती असंही तिनं सांगितलं आहे.

अनेकदा असंही झालं की, अ‍ॅक्ट्रेसचे सीन्स केवळ यासाठी बदलले जात होते, कारण तिच्यामुळं मेल अ‍ॅक्टरचं पात्र कमजोर वाटत असे. तापसीनं अशा विनाकारण केल्या जाणाऱ्या बदलांना कायमच विरोध केला आहे.

तापसीनं हेही सांगितलं की, लिड रोल करणाऱ्या अभिनेत्याला तिच्या बोलण्याच्या अंदाजामुळंही अडचण होत असे. तापसी म्हणते, एका सिनेमाच्या शूटिंगवेळी अभिनेत्याला माझा डायलॉग आवडला नाही. त्यांनी तो चेंज करायला लावला. जेव्हा मी यासाठी नकार दिला तेव्हा त्यांनी डबिंग आर्टीस्टला बोलावून तो डायलॉग करून घेतला.

तापसीनं सांगितलं की, दुसऱ्या कलाकारांमुळं तिला तिची फीदेखील कमी करण्यासाठी सांगितलं गेलं. जर एखाद्या मेल अ‍ॅक्टरचा मागील सिनेमा चालला नाही तर तिला तिच्या आगामी सिनेमात तिची फी कमी करण्यासाठी सांगितलं जात असे, ज्यामुळं बजेट कंट्रोल केलं जाऊ शकेल.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठूमध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरुबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लुप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.

 

You might also like