‘प्रेम म्हणजे थप्पड मारण्याचं लायसन्स नाही’, तापसी पन्नूचा व्हिडीओ ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू लवकरच आपला आगामी सिनेमा थप्पडमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच तिनं वॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक व्हिडीओ शेअर केला आह जो घरगुती हिंसाचारावर भाष्य करतो आणि एक मोठा संदेश देतो. तापसीचा ‘थप्पड’ हा सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. त्याआधीच तिनं थप्पडवरून सर्वांनाच महत्त्वाचा मेसेज दिला आहे.

आपल्या समाजात थप्पड खूप सामान्य मानली जाते. परंतु ही एक गंभीर बाब आहे असं तापसीनं या व्हिडीओतून सांगितलं आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तापसीला पहायला मुलगा आला आहे जो थप्पडला हलक्यात घेतो आणि ती थप्पड खाण्यास तयार आहे हे पाहून तिच्यासोबत लग्न करायला तयार होताना दिसतो.

तो म्हणतो की, मला तुझ्यासोबत लग्न करायला आवडेल (I would love to marry you). यावर तापसी म्हणते, मलाही तुझ्यासोबत लग्न करायला आवडेल परंतु मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.(I would like to marry you too but i cant love you). यानंतर तापसी असा मेसेज देते की, प्रेमात थप्पड मारण्याचं लायसन्स नाहीये. प्रेम केलं म्हणजे थप्पड मारण्यासाठी लायसन्स मिळतं का असा सवाल तिनं उपस्थित केला आहे. सध्या तापसीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

आजही समाजात महिलेला थप्पड मारणं ही गोष्ट हलक्यात घेतली जाते. परंतु ही काही हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही. एका आनंदी कपलमध्ये जेव्हा एक थप्पड येते तेव्हा त्यांच्या आयुष्याला कोणतं वळण लागतं हे सिनेमात पहायला मिळणार आहे.

You might also like