‘तारक मेहता…’ मधील रिटा रिपोर्टरनं केलं दिग्दर्शकासोबत लग्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    मागील बारा वर्षांपासून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी तर मालव राजदा हे त्याचे दिग्दर्शक आहेत.

या मालिकेत अभिनेत्री प्रिया अहुजा रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. २००८ पासून ती या मालिकेत काम करत आहे.

View this post on Instagram

Pink sky #nofilter

A post shared by Priya Ahuja | NewBornMommy (@priyaahujarajda) on

मालिकेत काम असतानाच प्रिया दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आणि २०११ मध्ये मालव आणि प्रिया बंधनात अडकले. त्यांना एक मुलगा देखील आहे.

View this post on Instagram

Blues 💙 #maldives #travelpics #travel

A post shared by Priya Ahuja | NewBornMommy (@priyaahujarajda) on

२००९ साली आलेल्या ‘द स्टोनमॅन मर्डर्स’ या चित्रपटातून प्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यात तिने केके मेनन आणि अरबाज खानसोबत स्क्रीन शेअर केला होता.

प्रिया समाजमाध्यमात सक्रिय असून पतीसोबतचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

‘तारक मेहता..’ प्रमाणे तिने अन्य मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. ‘अदालत’ या मालिकेतील तिच्या भूमकेला प्रेक्षकांची वाहवा मिळाली.

२०१० साली आलेल्या ‘अ‍ॅक्सिडेंट ऑन हिल्स’ मध्ये देखील तिने भूमिका साकारली आहे.

 

You might also like