‘तारक मेहता…’मधील ‘सोनू’ निधी भानुशालीनं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेत आधी सोनूची भूमिका साकारणारी अ‍ॅक्ट्रेस निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. निधीच्या हॉट अवतारानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निधीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. निधीनं बिकीनी घातली आहे. काळ्या आणि निळ्या रंगाच्या बिकिनीत निधी खूपच अ‍ॅक्ट्रॅक्टिव्ह दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही लिहिलं आहे. चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड अवतार खूप आवडला आहे. हे त्यांच्या प्रतिसादावरून दिसत आहे. अनेकांनी यावर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

सध्या निधीचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसनचं कौतुकही केलं आहे.

निधीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेत तिनं आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांची मुलगी सोनू हिची भूमिका साकारली होती.

 

You might also like