दयाबेन नसली तर काय झालं ? मालिका तर चालतीयं ना !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल १३ वर्षे ‘तारक मेहता’ या मालिकेला झाली आहेत. मनोरंजन विश्वात या मालिकेचे रेकॉर्ड अद्याप कुणी तोडलेलं नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका आहे. त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा असणा-या दयाबेननं ची गैरहजेरी सगळ्यांना निराश करणारी आहे. दयाबेनची भूमिका करणारी अभिनत्री दिशा वकानीनं तिच्या वैयक्तिक कारणास्तव ती मालिका सोडली. त्यानंतर त्याची जागा अद्याप कुठल्या अभिनेत्रीनं घेतलेली नाही. मात्र, त्यावरुन अंजली भाभीनं दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जिथे भारतीय व्यक्ती आहे त्यांनाही या मालिकेनं वेड लावलं आहे.

गेल्या महिन्यात त्या मालिकेतील जी काही प्रमुख पात्रं होती त्याची जागा नव्या कलाकारांनी घेतली आहे. मात्र त्यामुळे मालिकेच्या टीआरपीमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. यापूर्वी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा मेहताची जागा सुनयना फौजदारनं घेतली आहे. तिनं दयाबेनच्या येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दयाबेनची भूमिका करणा-या दिशा वकानीनं डिसेंबर २०१७ मध्ये त्या शो तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दिशाची त्यावेळी प्रेग्नंसी सुरु होती. त्या कारणामुळे शो मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा जॉईन करणार होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी अनेकदा सोशल मीडियावर त्याबाबत विचारणा केली होती.

त्यावर अंजलीभाभी फेम सुनयनानं प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, दयाबेन कधी येणार हे जर मला माहिती असते तर बरे झाले असते. मी कधी दिशाला भेटली नाही. त्यांना भेटायला मला आवडेल. आमच्यात मालिकेविषयी काहीही बोलणं झालेलं नाही. त्याविषयी असित सर अधिक माहिती देऊ शकतात.मला असे वाटते की, दरवेळी आम्हाला दयाबेनविषयी कुणी विचारत असते. ज्याबद्दल काहीही अधिकृत माहिती नाही त्यावर काय वक्तव्य करणार. मुळात तारक मेहता का उल्टा चष्मा हा कार्यक्रम सर्वांचा आहे. कुणा एकट्यावर त्याची जबाबदारी नाही. ते एक टीमवर्क आहे. सगळ्यांमुळे त्या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत आहे. मात्र त्याचे श्रेय कुणा एकाला नाही. त्याला कोणी एक जण लीड करत नाही. प्रत्येकाचे फेव्हरेटस आहेत. त्यामुळे शो सुरु आहे. अर्थात त्यातील काही कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली आहे. त्यांची लोकप्रियता आहे.