COVID-19 : 65 वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी, परंतु ‘तारक मेहता’मधील ‘बापूजी’ तरीही करणार शुटींग !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरसमुळं मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. फिल्मी आणि टीव्ही इंडस्ट्रीला तर टाळचं लागलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनं मात्र गाईडलाईन्ससोबत शुटींगला परवागनी दिली आहे. अशा आता तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचीही शुटींग सुरू होणार आहे. कारण यात कोणी जास्त लहान किंवा म्हातारं नाहीये.

सुरू होणार फिल्म आणि टीव्हीची शुटींग

नव्या गाईडलाईन्सनुसार, कोणताही 65 वर्षांहून अधिक वयाचा व्यक्ती, गर्भवती महिला, किंवा 10 वर्षांहून लहान मुलं, अॅक्टर्स किंवा स्टाफचे पार्टनर आदी लोक सेटवर नसतील. प्रत्येक सिनेमाच्या सेटवर डॉक्टर्स, नर्स आणि अॅम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे. जर कोणाला कोरोना झालाय असं कळालं तर त्याच्यावर तातडीनं उपचार व्हायला हवेत.

तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की 65 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला जर शुटींगसाठी परवनागी नाही तर तारक मेहतामधील म्हातारे चंपक चाचा कसे शुट करणार. तेही शुट करणार आहेत. कारण चंपक चाचा हे खरंच एवढे म्हातारे नाहीत जेवढे ते दिसतात.

मालिकेतील जेठालालचे बापूजी म्हणजेच चंपक चाचा हा रोल साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव अमित भट आहे. अमित जेठालाल साकारणाऱ्या दिलीप जोशीहूनही लहान आहे. अमितचं खरं वय 47 वर्षे आहे. दिलीप जोशी 52 वर्षांचा आहे. अमितनं आपली भूमिका अशी वटवली आहे की, कोणलाच त्याच्या खऱ्या वयाचा अंदाज येत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like