‘तारक मेहता’ शोला आणखी एक ‘झटका’ ! कमी फीस मिळाल्यानं ‘या’ अभिनेत्रीची ‘सोडचिठ्ठी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहेत. हा कार्यक्रम टीआरपीच्या यादीतही अव्वल राहिला आहे. यावेळी शोमध्ये बऱ्याच पात्रांची ओळख झाली होती. त्याचवेळी बर्‍याच स्टार्सनी शो सोडला आणि निघून गेले. पहिले टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधींने कार्यक्रम सोडला. त्यानंतर निधी भानुशालीनेही कार्यक्रम सोडला. त्याचवेळी दिशा वाकाणी बर्‍याच दिवसांपासून या शोमधून गायब होती. आता या शोला आणखी एक धक्का बसला आहे.
Related image
शोमध्ये बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियानेही हा कार्यक्रम सोडला आहे. वृत्तानुसार, मोनिका तिच्या वेतनामुळे खूश नव्हती. ती निर्मात्यांकडून जास्त पैशाची मागणी करत होती. बर्‍याच चर्चेनंतर जेव्हा तिची मागणी स्विकारली नाही तेव्हा तिने हा शो सोडला.

शोमधील तिच्या प्रवासाविषयी बोलताना मोनिका म्हणाली, “शो आणि कॅरेक्टर नक्कीच माझ्या मनापासून अगदी जवळ आहे. मी एक चांगल्या वेतनश्रेणीच्या शोधात होते पण त्यांना ते मान्य नव्हते. खरं तर, त्यांनी माझे वेतन वाढविले तर या शोमध्ये परत येण्यास हरकत नाही. परंतु मला असे वाटत नाही की ते होईल. होय, मी यापुढे या शोचा भाग नाही.

“मोनिका 6 वर्षांपासून या शोमध्ये कार्यरत होती. तिने 20 ऑक्टोबर रोजी शेवटचा भाग शूट केला. शोमधील तिचे पात्र बर्‍यापैकी मनोरंजक होते. जेठालालला नवीन नावे ठेवणे आणि जेठालालला त्रास देणे तिचे हे काम लोकांना खूप आवडत होते. मोनिकाने या शोद्वारे टीव्हीमध्ये पदार्पण केले होते. शोमध्ये मोनिकाची जागा कोण घेईल आणि बावरीची भूमिका कोण चांगल्याप्रकारे साकारेल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com